Download App

Vidhan Parish Election साठी भाजपची 10 जणांची यादी तयार; पंकजा मुंडे ते रावसाहेब दानवेंसह यांना संधी

Vidhan Parishad Election साठी काही नावांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Image Credit: letsupp

Vidhan Parishd Election BJP Candidate List : लोकसभेनंतर राज्यामध्ये विधान परिषदेच्या (Vidhan Parishad ) निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये आता भाजपकडून (BJP) विधान परिषदेसाठी काही नावांची यादी (Candidate List) केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजपकडून कुणाला मिळणार संधी?

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक. यांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जुलै महिन्यात ही निवडणुक पार पडणार आहे.

Maharashtra Budget : महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा, अनेक नव्या योजना सुरू करणार

विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेल्या विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Sri Lanka : श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ; 24 तासांच्या आत दोन प्रशिक्षकांचे राजीनामे

या निवडणुकीसाठी मंगळवारी 25 जून रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर 3 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतदान झाल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज