राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद (whip) भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) केलं आहे. राहुल नार्वेकर नूकतेच लंडनहुन मुंबईत दाखल झाले असून लंडनहुन परतताच त्यांनी हे विधान केलं आहे.
Aryan Khan Case: नवऱ्यावर गंभीर आरोप होताच; क्रांती रेडकर मैदानात, म्हणाली….
राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती कायमची बेकायदेशीर ठरवलेली नाही. विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार कसे बजवायते ते मला माहिती आहे. त्यामुळे कोणी काहीही मागणी करेन, त्यावर मला काही टीपण्णी करण्याची गरज वाटत नसल्याचं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा निवडणूक प्लॅन; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप
तसेच आम्ही सर्व नियम आणि तरतुदींचा विचार करुन योग्य निर्णय आगामी काळात घेऊ. शक्य झालं तर 15 दिवसांत निर्णय घेऊ. त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर जास्त वेळ घेऊ. कुणाच्या सांगण्यावरुन आम्ही निर्णय घेणार नाही आहोत. नियमाप्रमाणे, सर्व नियम लागू करुन जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आम्ही घेणार, असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.
Mocha Cyclone : मोखा चक्रीवादळाने धारण केलं रौद्ररूप, किनारी भागाला सतर्कतेचा इशारा
दरम्यान, सत्तासंघर्षाच्या निर्णयाच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवलीय. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून याबाबत लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज करण्यात आलीय.
त्यानंतर तत्काळ राहुल नार्वेकर हे परदेशी दौरा करुन भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात सत्तासंघर्षाबाबत नेमका काय निर्णय होणार? 16 आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष काय घेणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.