Download App

‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’; वडेट्टीवारांनी कांदा उत्पादकांची परिस्थिती सांगितली…

vijay wadettiwar : ‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’ असंच कांदा उत्पादकांना लटकवलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

“होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” भाजप खासदार अन् सख्ख्या मित्राचा दावा

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे, अशातच कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून सरकारने राज्यात लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

तसेच राज्यात दरवर्षी 50 टक्के कांदा तयार होतो, दररोज एक लाख टन कांदा मार्केटला विकला जातो, केंद्र सरकारने मात्र, फक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आस्मान में गिरा अन् खजूर में लटका असं शेतकऱ्यांना लटकून ठेवलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

तीन मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर

कांद्याच्या निर्णयावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. कांदा खरेदीचा निर्णय कृषिमंत्र्यांनी घोषित करण्याआधीच केंद्र सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतून तर उपमुख्यमंत्री जपानमधून घोषणा करीत असल्याचं दिसून आलं, हा सर्व श्रेयवाद सत्ताधारी पक्षात दिसून येत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मीठ चोळण्याचं काम करु नये, आणि कांदा निर्यात शुल्काबाबत ठोस निर्णय घ्यावा, कांदा निर्यात शुल्क रद्द करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

follow us