Vijay Wadettiwar : ऑपरेशन टायगर अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे सहा खासदार फोडले आहे. आता ऑपरेशन टायगर 2 राबवत ठाकरेंचे 14 आमदारही फोडणार असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसचे आमदार आणि जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसची साथ सोडणार असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आमचे चांगले मित्र आहेत. ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही चांगले मित्र आहेत. विदर्भातील ताकदीचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सर्वात जास्त मला आनंद होईल. खरंतर मी स्वत : देखील विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काम केलं आहे असं माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले. तर यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्न उद्धवत नाही – विजय वडेट्टीवार
ते म्हणाले की, माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला आहे. काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा परसवण्याचे काम करत आहेत.
केतन केसांचा विग घालत होता? वडिलांनी सर्वकाही सांगितलं
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कुणाला भेटलो? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जात आहेत. यात कोणतंही तथ्य नसतानाही असे प्रश्न विचारुन मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. हा खोडसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी काँग्रेसचा निष्ठावंच कार्यकर्ता असून पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्न उद्धवत नाही असं यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.
