Vikas Lawande : राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पोलिसांनी अटक केली आहे. एका फिर्यादीवरुन पुणे पोलिसांनी कारवाई करत विकास लवांडे यांना अटक केली असल्याची देखील सध्या माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत या प्रकरणात आपली भूमिका व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका खोट्या फिर्यादीवरुन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असं विकास लवांडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. – विकास लवांडे
विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे (Wagholi Police Station) पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.
“मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे” : ‘शेखर टुनाइट’मध्ये वडिलांच्या आठवणींनी बॉबी देओल भावूक
हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा परिसरात शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विकास लवांडे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या सहकाऱ्यांसह पुण्याकडे परतत असताना त्यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी संग्राम महाराज भंडारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
