Vikhe-Lanke’s joint venture on Nagar-Manmad Road : नगर मनमाड रस्त्यातची अक्षरश:चाळण झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णत्वास येत नसल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता पुन्हा एकदा याच रस्त्याच्या प्रश्नावरून आजी खासदार व माजी खासदार म्हणजेच निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यामध्ये राजकीय शाब्दिक चकमक झाली. ज्यांनी या रस्त्याचा शब्द दिला निवडून आले. त्यांनी हे काम पूर्ण करावे. अशा शब्दांत सुजय विखेंनी लंकेंना टोला लगावला तर काहींना माझे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही. अशा शब्दांत लंकेनी ही विखेंना टोला लगावला.
Masti 4 : रितेश, विवेक आणि आफताब यांचे धमाकेदार गाणे “पकड पकड” प्रदर्शित
अहिल्यानगर ते मनमाड या रस्त्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र हा रस्ता काही केल्या पूर्णत्वास आलेला नाही. ह्या रस्त्यावरती मोठी वर्दळ असल्याने रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा व तातडीने व्हावा. अशी मागणी वाहनधारकांकडून अनेक वर्षांपासून सुरू आहे. तसेच या रस्त्याबाबत राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील वेळोवेळी आंदोलन केले. या रस्त्याचे काम करणारे अनेक ठेकेदार पळून गेले. तसेच काहींना ब्लॅक लिस्टमध्ये देखील टाकण्यात आलेले आहे.
ज्यांनी आश्वासन दिले त्यांना प्रश्न विचारा…
दरम्यान हा रस्ता कधी पूर्ण होणार?याबाबत सुजय विखे यांना विचारले असता ते म्हणाले की,नगर मनमाड रस्त्यासाठी ज्यांनी उपोषण केले,तसेच उपोषणाद्वारे ज्यांनी निवडणुकीत मत मिळवले.तेच या रस्त्याबाबतचे उत्तर योग्य देऊ शकतात.तसेच या रस्त्याचे काम मी खासदार असताना तर करतच होतो.मी लोकांना सत्यही सांगत होतो.मात्र काही ठराविक लोकांनी आवाज निर्माण केला की,नगर पाथर्डी रोडचे काम देखील माझ्या उपोषणामुळे सुटले.त्यामुळे तुमच्या उपोषणामुळे आता नगर-मनमाड रस्त्याचा प्रश्न देखील सुटला पाहिजे. आज माझा पराभव झालेला आहे.मी माझी खासदार नाही त्यामुळे आता ज्यांनी निवडणुकीत आश्वासन देऊन निवडून आलेले आहे.ही आता त्यांची नैतिक जबाबदारी आहे की,या रस्त्याबाबत उत्तर देणे अशा शब्दांत एक प्रकारे सुजय विखेंनी निलेश लंकेंना टोला लगावला.
लंकेचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही
नगर मनमाड रस्त्यावरून सुजय विखे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश लंके म्हणाले , या जिल्ह्यात काही नेतेमंडळींना व्यासपीठावर आल्यावर निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय काहींचं भाषणच पूर्ण होत नाही.त्यामुळे मी अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो.मला जनतेला कौल दिलेला आहे.जनतेने मला स्वीकारलेला आहे.त्यामुळे मी त्यांच्या कामातच लक्ष देतो.नको त्या ठिकाणी मी जास्त सहभाग घेत नाही.मी कोणाचे नाव घेत टीका टिप्पणी करत नाही.कामाला महत्त्व दिले पाहिजे असे यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले.
मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल; पार्थ पवारांवरही फौजदारी कारवाई होणार?
तसेच पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले,गेले सहा वर्ष तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होतात.आता मी खासदार होऊन वर्ष झालं.त्यानंतर मी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून त्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले.दुसऱ्या ठेकेदार आला त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने त्याचा देखील टेंडर कॅन्सल झाल्यावर तिसरे टेंडर आलं व त्या ठेकेदाराला काम सुरू झाले.त्याला देखील काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या मात्र आता हे काम माझ्याच कार्यकाळात सुरू झाले असून माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल असा शब्द यावेळी निलेश लंके यांनी दिला.
