Vikram Kakade On Jay Pawar : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारणात चांगलेचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे.
तर दुसरीकडे विक्रम काकडे (Vikram Kakade) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना विक्रम काकडे यांनी तब्बल 10 कोटींचा कर्ज दिला असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर आता विक्रम काकडे यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार (Jay Pawar) यांना ऍडव्हान्स लोन दिलेला होता अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना विक्रम काकडे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना विक्रम काकडे म्हणाले की, मी जिथे राहतो त्याच्या बाजूचा प्लॉट जे पवार यांचा नावावरती आहे, ती जागा मला हवी होती म्हणून ऍडव्हान्स लोन दिलेला होता अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षात अनेक जण नाराज झाले होते यावर देखील त्यांनी आता भाष्य केले आहे.
विक्रम काकडे म्हणाले, अनेक जण इच्छुक होते. एकदा उमेदवार जाहीर झाला की पक्षांतर्गत नाराजी दूर होते. मी सगळ्यांची कालपासून भेट घेत आहे. जे नाराज होते त्या सगळ्यांना भेटलो. काल सुनील टिंगरे यांना देखील भेटलो. निवडणूक लागली तर रणनिती कशी असावी याची चर्चा करावी. महाविकास आघाडीने जर माघार नाही घेतली तरी आम्ही तयारी केली आहे.
आमच्याकडे मताधिक्य जास्त आहे. जिल्ह्यातील 95 टक्के मतदार आमच्याकडे आहेत. सगळी मतं मलाच मिळतील. महायुती म्हणून सोबत आहोत. प्रदीप कंद माघार घेतील असा विश्वास आहे आणि महायुतीची मतं विभागणार नाहीत असं माध्यमांशी बोलताना विक्रम काकडे म्हणाले.
