Download App

विक्रम काळे पायऱ्यांवर घोषणा देत होते, केसरकर आले आणि काळेंना सुनावून गेले, काय घडलं वाचा

  • Written By: Last Updated:

Vikram Kale : विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार विक्रम काळे हे आज शिक्षकांच्या मुद्यावर विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन करत होते, त्याचवेळी समोरून मंत्री दीपक केसरकर आले आणि त्यांनी विक्रम काळे यांना सुनावले. त्यामुळे विक्रम काळे विरुद्ध दीपक केसरकर यांच्या वादाची चर्चा आज विधानभवनात रंगली

राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत, वरिष्ठ महाविद्यालयांत देखील शिक्षक उपलब्ध नाहीत. याची लवकरात लवकर भरती करण्यात यावी या मागणीसाठी विक्रम पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्यावेळी समोरून राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आले. विक्रम काळे शिक्षक भरतीसाठी पायऱ्यांवर आंदोलन करत असल्याचे पाहून केसरकर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की सभागृहात काही वेळापूर्वी तुम्हाला मी मुदतवाढ दिल्याचं सांगितलं तरी तुम्ही आंदोलन करत आहात हे बरोबर नाही. त्यावर विक्रम काळे यांनी एवढा एकच प्रश्न आमचा नाही, बाकीही काही मागण्या आहेत, त्यासाठी आंदोलन करत असल्याचं सांगितलं.

आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय ? ; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

त्यावर दीपक केसरकर यांनीही, तुम्ही ज्या ज्या वेळी माझ्याकडे मागण्या घेऊन आला, त्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे हे असे आंदोलन करणे बरोबर नाही. असं सांगितलं. त्यावर विक्रम काळे यांनी पुन्हा एवढा एकच प्रश्न आमचा नाही, बाकीही काही मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमचा तो अधिकार आहे, असं सांगितलं.

यानंतर दीपक केसरकर काळे यांना सुनावून निघून गेले पण विधिमंडळ अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी घडलेला हा किस्सा चांगलाच गाजला. विक्रम काळे विरुद्ध दीपक केसरकर यांच्या वादाची चर्चा आज विधानभवनात रंगली.

दरम्यान विधिमंडळात आज राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात विरोधकांवर जोरदार प्रहार केले.

शिंदे म्हणाले, काल विधिमंडळाच्या आवारात जो प्रकार घडला त्याचे समर्थन आम्ही करत नाही. याबाबत आमची बैठकही झाली आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून आमचे फोटो लावून खोके म्हणणे, आम्हाला चोर म्हणणे, मिंधे म्हणणे, गद्दार म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणं, मिंधे म्हणणं. चोर म्हणणं हे कोणत्या आचारसंहितेत बसतं नाना ?, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना उद्देशून केला.

Pakistan : काश्मीरवर बोलले, पाकिस्तानींना भर कार्यक्रमातून हाकलले; अमेरिकेतील प्रकार..

Tags

follow us