महाराष्ट्राचे नवीन पप्पू दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करताय; रोहित पवारांच्या आंदोलनावरून पाचपुतेंचा टोला

Vikram Pachpute criticize Rohit Pawar भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी रोहित पवारांना तेट पप्पू म्हणत टोला लगावला आहे.

Vikram Pachpute Criticize Rohit Pawar

Vikram Pachpute Criticize Rohit Pawar

Vikram Pachpute criticize Rohit Pawar for Pune MPSC Protest : पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. विविध मागण्यांमुळे आंदोलनात वेगवेगळे गट निर्माण झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावर आता भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी रोहित पवारांना तेट पप्पू म्हणत टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले विक्रम पाचपुते?

अहिल्यानगर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पुणे या ठिकाणी सुरू असलेले आंदोलन हे आंदोलन राहिलेलं नसून रोहित पवार नाईट्स आहे. कारण नाईट शिफ्टमध्ये हे आंदोलन सुरू आहे. दिवसभर तिथे फक्त 50 100 लोक असतात. हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आंदोलन आहे. आंदोलन स्थळावर एंटरटेनमेंट असतं तिथं कॉमेडीयन येऊन गेले आहेत. तिथे वेगवेगळे गाणी होतात. आता हे आंदोलन फक्त करमणुकीचे साधन राहिले आहे.

गावच्या मातीतून थेट कलेक्टरच्या खुर्चीवर! ‘बंधू’मध्ये विठ्ठल काळे साकारणार दमदार भूमिका

रोहित पवार फक्त फार्स करतात, त्यांना लवकरच काँग्रेसमध्ये जायचं यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांना दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करायचं महाराष्ट्राचे नवीन पप्पू तयार होता येते असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावरती भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी टीका केली. तर खासदार ओम राजे निंबाळकर हे आंदोलन स्थळी पोहोचले असता त्यांना विद्यार्थ्यांनी ट्रोल केलं असल्याचा आरोप देखील भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानेश कुमारांना मोठा दिलासा; निलंबनाला तूर्तास नकार, निवडणूक आयोगाला नोटीस

दुसरीकडे या आंदोलनाला हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असून शरद पवार यांनीही या आंदोलनात लक्ष घातले आहे. दरम्यान, आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.

Exit mobile version