मी वाघ आहे.., तुझे सगळे धंदे बाहेर काढणार, 2029 ला आमदार होऊ देणार नाही; बजरंग सोनवणे धनंजय मुंडेंवर भडकले

Bajrang Sonawane On Dhananjay Munde :  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे.

Bajrang Sonawane On Dhananjay Munde

Bajrang Sonawane On Dhananjay Munde

Bajrang Sonawane On Dhananjay Munde :  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा नाव देखील एफआयआरमध्ये दाखल करण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियावर जोराने होत असून पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे तर इतर फरार आरोपींचा शोध घेत आहे.

तर दुसरीकडे आता या प्रकरणावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणापशी, कुठे आणि किती वाजता असतो हे माहिती असून सगळे धंदे बाहेर काढणार असा इशारा माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव येणं दुर्दैवी आहे पण ठीक आहे आलय. ज्यांना राजकारण करायचं ते त्यांना करु द्या. हे प्रकरण जे आहे ते त्यांच्या वैयक्तिक भांडणातून त्यांच्या वैयक्तिक काही विषयतून आहे. विलास घुले आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई कराच पण दोषी नसून देखील माझा आणि माझ्या कुटुंबियांचा नाव घेणे हे दुर्दैवी आहे असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.

धनंजय मुंडे यांना सभागृहामध्ये बोलायचा अधिकार – बजरंग सोनवणे

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की,धनंजय मुंडे सभागृहाचे सदस्य असल्याने त्यांना सभागृहात बोलायचा अधिकार आहे. धनंजय मुंडे 2029 पर्यंत विधानसभेचे सदस्य आहे. 2029 नंतर सदस्य राहणार की नाही हे बघा. 2029 नंतर सदस्य नाही राहिल्यावर बघू आता सदस्य आहे बोलू द्या. काय बोलायचं ते बोलू द्या, जनता काय करते बघू 2029 ला आमदार होऊ देणार नाही असं देखील यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले. तसेच हे कोण करत आहेत हे सर्वांना माहिती आहे. मी कशाला कोणाचं नाव घेऊ. त्याचं नाव घेऊन बोलायला तो एवढा मोठा नाही. मी पदाने मोठा आहे, वयानं मोठा आहे फक्त पैशांनी मोठा नाही. त्यांनी ब्लॅक आणि वाईट धंदे करुन पैसे कमवले आहे.

NEET UG पेपरफुटी प्रकरण, काँग्रेसचे देशव्यापी ‘छात्रों की गूंज’ आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सगळे बाकीचे धंदे काढणार – बजरंग सोनवणे

माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री धनजंय मुंडे यांना इशारा देखील दिला. यावेळी सोनवणे म्हणाले की, तुझे सगळे बाकीचे धंदे काढणार, तू काय काय करतो? कुठे कुठे जातो? कुणापाशी असतो? कुठे असतो, किती वाजता असतो हे सगळं माहिती आहे. त्यांनी जखमी वाघाच्या जबड्यात हात घालायचा प्रयत्न केला आहे. मी जखमी आहे असं त्यांना वाटलं पण मी वाघ आहे वाघच राहणार असेही यावेळी खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.

Exit mobile version