Woman lawyer Assaulted in Beed : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे एका वकील महिलेल्या अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गावातल्या 10 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. (Beed )अॅड. ज्ञानेश्वरी अंजान असं या वकील महिलेचं नाव आहे. ही घटना 14 एप्रिल रोजी घडली आहे. मात्र, यातील सर्व आरोप गावकऱ्यांनी फेटाळथ हा सगळा बनाव असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने या प्रकरणाला नवं वळन लागलं आहे.
बीड पुन्हा हादरलं! सरपंच अन् कार्यकर्त्यांकडून सत्र न्यायालयातील वकिल महिलेला जबर मारहाण
मारहाण झालेली महिला वकील आणि तिचं कुटुंब कायमच गावाला कायम त्रास देतं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातल्या लोकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास देण्याचं काम हे कुटुंब आधीपासून करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर गावातल्या एका प्रतिष्ठीत व्यक्तीने, या कुटुंबाने मृत आजोबांच्या प्रेताला अमानुषपणे मारहाण करुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
मृत आजोबांना मारहाण
वकिल महिलेचे स्वतःचे आजोबा मयत झालेले असताना त्यांच्या शरीरावरती अमानुषपणे काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांचा मुलगा आणि वकील मॅडमने ही मारहाण केली होती. मात्र, गावातल्या सात जणांवर हा 302 (खुनाचा गुन्हा) दाखल केला होता. तपासामध्ये हा खोटा गुन्हा आहे, हे सिद्ध झालेलं होतं. तरीही प्रशासनाने त्यांच्यावर कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही असंही गावकरी म्हणाले आहेत. त्यांच्या आजोबांचा फुफ्फुसाला आणि मेंदूला सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं होतं असंही ते म्हणाले आहेत.
नार्को टेस्ट करावी
एकदा याच वकील मॅडमच्या आईने घरगुती कारणामुळे विष प्राशन केलं होतं. रुग्णालयात उपचार घेताना मेंटल असल्याचं कारण देऊन विष घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर वकील मॅडमच्या सांगण्यानुसार गावातील तीन जणांवर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्या केसमध्ये देखील आरोपी आणि फिर्यादी यांची नार्को टेस्ट करावी. मी जर दोषी असेल तर मला फाशी देण्यात यावी. विनाकारण गावकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. यामध्ये आता कोण खर आणि कोण खोट हे तपासानंतर समोर येईल.