Download App

दर्शन झालं सोपं! त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून व्हीआयपी दर्शन बंद, ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय

  • Written By: Last Updated:

Trimbakeshwar VIP Darshan : अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) महादेवाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची गर्दी होत आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे (VIP Darshan) सर्वसामान्य भाविकांना तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून केंद्रीय आणि राज्य स्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हिआयपी पाहुण्यांना वगळण्यात आले आहे. (VIP darshan off at Trimbakeshwar temple till September 15 decision of the trus)

नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे सर्वात प्राचीन ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यामुळे इथं देश-विदेशातील भाविकांची गर्दी असते. त्यातच यंदा अधिक मास असल्यामुळं भाविकांची गर्दीही वाढली आहे. शिवाय, आगामी सार्वजनिक सुट्ट्या आणि निज श्रावणामुळे ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन इथं येतात. चार ते पास तास रांगेत उभे राहतात. मात्र, पाच सेकंदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जाते. त्यात व्हिआयपी आल्यास आणखी अडचण होते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने त्र्यंबकेश्वर मंदिरात 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

Vijay Wadettiwar : आता बजरंगबलीच रवी राणाची पाठ फोडतील; वडेट्टीवारांचा घणाघात 

या निर्णयाबाबतचे पत्र त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती, मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांच्या आदेशाद्वारे येणाऱ्या पाहूण्यांना व्हिआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

भाविकांना लाडू, बिस्किटे
निज श्रावण महिन्यानिमित्त दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापासून दर्शनबारीत उभ्या असलेल्या भाविकांना दर्शनानंतर राजगिराचे लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत मोफत बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

follow us