Ajay Bagul Arrested : गंगापूरच्या विसेमळा गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल याला अटक केली आहे. याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणात पप्पू जाधव आणि एका अन्य आरोपीला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडेला आणि अमोल पाटील अटक केली होती. भाजप नेते सुनील बागूल (Ajay Bagul Arrested) यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र न्यायालयात हजर होण्यापूर्वी राजवाडे यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र वैद्यकीय तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.
नॅट सायव्हर-ब्रंटने रचला इतिहास; महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू
अजय बागुल अटक
तर दुसरीकडे या प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल हा फरार होता मात्र आता पोलिसांना त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अजय बागुल, पप्पू यादवसह आणखी एकाला अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
मोठी बातमी, संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बजावली नोटीस