नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांचा हल्लाबोल

Vivekananda Patil On Navnath Ban : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून

Vivekananda Patil On Navnath Ban

Vivekananda Patil On Navnath Ban

Vivekananda Patil On Navnath Ban : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थींकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या विवेकानंद पाटील यांनी आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर आरोपांना प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे. नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रोहित पवारांच्या आंदोलनात नाईट लाईफ सुरु असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की, रोहित पवार यांचे आंदोलन राजकीय आंदोलन आहे. रोहित पवार विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे सांगत आहेत. नाईट लाईफला कोण धांगडधिंगा घालत आहेत. मद्यपान करण्याचा व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत असं माध्यमांशी बोलताना नवनाथ बन म्हणाले. त्यांच्या या आरोपांवर आता विवेकानंद पाटील (Vivekananda Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

विवेकानंद पाटील म्हणाले की, नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस आहे. रोज आरोप करत सुटतात. नवनाथ संप्रदायातील नऊ नाथ कोणते आहेत आणि भागवत संप्रदायासोबत नवनाथ संप्रदाय काय आहे हे सांगितलं तर मी त्यांना उत्तर देतोय असं म्हणत विवेकानंद पाटील यांनी नववाथ बन यांच्यावर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना आंदोलन (MPSC Student Protest) मागे घेण्याची विनंती केली होती यावर देखील प्रतिक्रिया दिली.

12 तासांत चार पत्रकार परिषदा अन् दोन मंत्र्यांचे गंभीर आरोप; राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लावली ताकद-

जोपर्यंत आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, लोकशाही आहे, संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे वाटतं ते करु मात्र, राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असं यावेळी विवेकानंद पाटील म्हणाले.

Exit mobile version