Download App

माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान; अजित पवार अन् चंद्रराव तावरेंमध्ये फाईट

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज रविवार रोजी मतदान होत आहे. यामध्ये अजित पवार चेअरम पदाचे उमेदवार आहेत.

  • Written By: Last Updated:

Malegaon Cooperative Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज रविवार (दि. २२ जून २०२५) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उमेदवार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. (Sugar) त्यामुळं ही निवडणूक रंगात आली आहे. तसंच, अजित पवार उमेदवार असल्याने कोण बाजी मारणार यावर खल सुरू झाला आहे.

आज मतदान पार पडत असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९ हजार ६५१ इतकी आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होत आहे.

यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. या तिन्ही पॅनेलमध्ये होणारी लढत कारखान्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

अजितदादांना माळेगावचे चेअरमन व्हायचंय, पण का ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले आहे. तसंच, सुप्रिया सुळे यांनी शंभुसिह महाराज हायस्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे देखील मतदानासाठी दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी रंजन तावरे यांना शुभेच्छा दिल्या. रंजन तावरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘ही लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे, ते तो पार पाडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? मी ३५ वर्षे इथे काम करतोय असं उत्तर त्यांनी दिलं.

follow us