Download App

अजितदादांना पहिला धक्का : शरद पवारांनी मकरंद पाटलांना बसवलं गाडीत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांना 24 तासांच्या आत पहिला धक्का बसला आहे. काल पर्यंत अजित पवार यांच्यासोबत असलेले वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे आज शरद पवार यांच्या गाडीत बसलेले दिसून आले. मकरंद पाटील यांना घेऊनच ते कराड येथील प्रितीसंगमकडे रवाना झाले. प्रितीसंगम येथे आज शरद पवार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर आपण लोकांसमोर जाणार असल्याचे म्हणत शरद पवार यांनी आपला पुढील इरादा स्पष्ट केला. (Wai MLA Makarand Patil travel with Sharad Pawar from khandala to Karad)

काल अजित पवार यांच्या बंडावेळी शरद पवार दिवसभर पुण्यात होते. त्यानंतर ते आज कराडकडे रवाना झाले. यावेळी सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार आणि प्रतिभाताई पवार उपस्थित होते. याचवेळी वाईचे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत असल्याचे पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या. स्वागत झाल्यानंतर शरद पवार यांनी मकरंद पाटील यांना थेट गाडीत बसवलं.

अजित पवार यांच्यासोबत काल 40 आमदार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये मकरंद पाटील यांचेही नाव होते.  ते राजभवनावर देखील उपस्थित होते. मात्र रात्रीत ते वाईला परत आले आणि आज थेट शरद पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या गाडीत बसलेले दिसून आले. यावेळी बाजूला रोहित पवार आणि शरद पवार तर मध्ये मकरंद पाटील असं काहीस दृश्य राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.

अजित पवारांसोबत असलेले आमदार

1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते

विधानपरिषदेचे आमदार कोणते ?

1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4.
5.
6.

अजित पवारांसोबत खासदार कोणते ?

1. सुनिल तटकरे
2. अमोल कोल्हे
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

शरद पवारांसोबत कोणते आमदार ?

1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09. संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक

विधानपरिषद आमदार कोणते ?

1. अरुण अण्णा लाड
2.
3.

शरद पवारांसोबत खासदार कोणते ?

1.सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)

यांची भूमिका अद्याप अस्पष्ट :

1. नवाब मलिक
2.प्रकाश सोळंखे
3. बाळासाहेब आजबे
4. आशुतोष काळे
5. दिलीप बनकर
6. माणिकराव कोकाटे
7. चंद्रकांत नवघरे
8. राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)

Tags

follow us