Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून नव्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) शुक्रवारी (दि.22) अंतिम मान्यता दिली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेची (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) अधिसूचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांना 22 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची संधी दिली गेली असून, त्यानंतर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी देणार असून त्यानंतर महापालिका आयुक्त प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर करतील.
गुगल मॅप व 2011 च्या जनगणनेच्या आधारे प्रारूप प्रभाग रचना
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या टीमने गुगल मॅपचा आधार घेऊन तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्थानिक परिसंस्थांचे अभ्यास करून 32 प्रभागांची नकाशे तयार केली आहेत. या प्रभागांची सुरुवात तळवडे-चिखली भागापासून होऊन सांगवी परिसरापर्यंत केली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17 लाख 29 हजार असून त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार ते कमाल 59 हजार मतदार असतील. मात्र शहरातील मतदारसंख्या सुमारे 17 लाख 75 हजार असून पुढील 15 वर्षांत वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी स्वीकारली जाईल आणि त्यानुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभागली जाईल.
प्रभाग आरक्षणाचे स्वरूप
नव्या रचनेनुसार 128 जागांपैकी 93 जागा आरक्षित केल्या जातील. त्यामध्ये:
– महिला: 64 जागा
– पुरुष: 64 जागा
– अनुसूचित जाती: 20 जागा
– अनुसूचित जमाती: 3 जागा
– इतर मागास वर्ग (ओबीसी): 35 जागा
– सर्वसाधारण महिला (खुला): 35 जागा
– सर्वसाधारण (खुला): 35 जागा
अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर या आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात येतील.
सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून; सचिन सावंतांचा हल्लाबोल
पुढील टप्पा
प्रभाग रचनेच्या प्रारूप जाहीरनंतर नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांकडून हरकत व सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर संसद व सुनावणी प्रक्रियेनंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. ही निवडणूक 2017 नंतर महापालिकेची पहिली निवडणूक होणार असून त्यामुळे निवडणूक इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.