Download App

राज्यात पावसाची दडी! 329 गावं, 1273 वाड्यांना 351 टँकरने पाणीपुरवठा

  • Written By: Last Updated:

मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे अनेक पाणवठे अजूनही कोरडीच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई वाढते. सध्या राज्यातील 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर सुरू (Water supply by tanker) आहेत. येत्या काळात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाई (water shortage) आणखी तीव्र होऊन टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कृषी विभागाने आज बैठकीत माहिती दिल्याप्रमाणे सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 61.90 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 80.90 टक्के पाणी साठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 70.47 टक्के, अमरावती 66.57 टक्के, औरंगाबाद 31.65 टक्के, नाशिक 57.16 टक्के, पुणे 68.23 टक्के आणि कोकण 87.25 टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. अनेक जिल्यातमध्ये पावसाची प्रतिक्षा आहे. दमदार पाऊस न झाल्यानं पाणवठ्यांमध्ये अल्प प्रमाणात पाणी आहे. त्यामुळं आजघडीला राज्यात तब्बल 329 गावे आणि 1 हजार 273 वाड्यांमधून 351 टँकर्स सुरु आहेत.

Sonam Kapoor : मला कामाची प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते; सोनम करणार कमबॅक 

कृषी विभागाने आज बैठकीत माहिती दिल्याप्रमाणे राज्यात 139.35 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 91 टक्के पेरणी झाली आहे. 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले 6 जिल्हे असून, 75 ते 100 टक्के पाऊस झालेले 13 जिल्हे आणि 50 ते 75 टक्के पाऊस झालेले 15 जिल्हे आहेत. राज्यात 25 ते 50 टक्के पाऊस झालेले 13 तालुके आहेत.

दरम्यान, या पाणीटंचाईच्या अनुषंगाने कृषी व महसूल व संबंधित विभागाने नियोजन करावे. तसेच चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

राज्यात पावसाची दडी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे. विदर्भासह, मराठवाड्यातील पिके पावसाअभावी सुकू लागली चांगला पाऊस पडू, पिकांना पुन्हा बहर येऊ दे आणि पाण्याची क्षेत्र तुंडूंब भरभरून वाहू दे, अशी प्रार्थना शेतकरी करत आहे.

 

Tags

follow us