राज्यात कुणी कितीही कुरघोड्या करु द्या, पुन्हा भाजप-शिवसेना युतीचंच सरकार आणायचंय, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वपूर्ण घेण्यात आले आहेत. यावेळी राज्यात पुन्हा युतीतचंच सरकार आणायचं असल्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
पवार म्हणजे वैचारिक व्हायरस; सदावर्तेंनी ‘गुण’ उधळले
तसेच भाजप-सेनेच्या युतीतील वाद मिटवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून कुणी कितीही कुरघोड्या करु द्या, पुन्हा युतीचंच सरकार आणायचंय, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Video : आता वारकरीच आरोपीच्या पिंजऱ्यात; आळंदी लाठीचार्ज प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संघटना मजबूत करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी सूचना केल्या आहेत. तसेच आगामी निवडणुका शिवसेना भाजप युतीसोबतच लढणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Kolhapur News : कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक, चौकांमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात…
तसेच राज्यात विरोधकांकडून कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचा आरोप करीत शिवेसेनेच्या सर्वच आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी कितीही कुरघोडी झाल्या तरीही राज्यात पुन्हा भाजप युतीचच सरकार स्थापन करण्यासाठीच प्रयत्न करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
या बैठकीला शिवसेनेचे सर्वच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, सध्या राज्यात स्थापन झालेल्या भाजप-शिवसेना युतीमध्ये कुठलेही मतभेत नसून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीस उपस्थित असणाऱ्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना केलं आहे.