Download App

पवार अन् ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला कधीही..नाराज असलेले छगन भुजबळ असं का म्हणाले?

यानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि शरद पवार तसंच

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाबत एक भाष्य केलं आहे. तसंच, गेल्या काही दिवसांपासून ते नाराज आहेत कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. (Chhagan Bhujbal) याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे.

वाकीफ कहां जमाना हमारी, भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक अन् शुभेच्छा

काय म्हणाले छगन भुजबळ?

नाराजी दूर करण्यासाठी सुनील तटकरेंचा तुम्हाला फोन आला होता का? असं विचारलं असता, मला काही कुणाचा फोन वगैरे आलेला नाही असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे. तसंच तुमची नाराजी दूर झाली आहे का? असं विचारताच छगन भुजबळ म्हणाले, ‘मी नाराज आहे, नाराज आहे असं रोज सांगत बसू का? तसं रोज रोज सांगत राहिलो तर लोक चॅनल पाहणं बंद करतील. तो विषय सोडून द्या.

मी मागितलेला नाही

धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी होते आहे. याबाबतही छगन भुजबळ यांना विचारलं असता कुणाचंही मंत्रिपद काढून मला मंत्री करु नये असं उत्तर भुजबळ यांनी दिलं आहे. भुजबळ म्हणाले, कुणाचंही मंत्रिपद काढून मला ते मिळावं अशी अपेक्षा मी जन्मातही केलेली नाही, करणार नाही. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. जी काही चौकशी होईल ती होईल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करायचं ते पाहून घेतील असंही ते म्हणाले.

पवार आणि ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं

यानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि शरद पवार तसंच अजित पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. नव्या वर्षात ते एकत्र आलेले दिसावेत अशी इच्छा आहे असंही आशाताई पवार म्हणाल्या. या चर्चांबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, पवार कुटुंब असेल, ठाकरे कुटुंब असेल त्यांनी एकत्र यावं. माझ्या त्यांना शुभेच्छा. हे सगळे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल.

छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. त्या ठिकाणी या दोघांनी सुरुवातीला एकमेकांशी संवादही साधला नाही मात्र नंतर एक संदेश शरद पवारांनी निमंत्रण पत्रिकेवर लिहिला जो छगन भुजबळ यांनी वाचला. त्या कृतीचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता छगन भुजबळ यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र यावं माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं आहे.

follow us