Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. तर पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा (Rain Alert in Maharashtra) इशारा देण्यात आला आहे. आज चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
सध्या दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने कहर केला आहे. दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. काल दुपारी हे वादळ आंध्र प्रदेशच्या बापटला समुद्र किनारपट्टीवल धडकले. यामुळे वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर इतका वाढला होता. या वादळाचा फटका शेतातील पिकांना बसला. तसेच मोठी वित्तहानी सुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. रब्बी हंगामातही अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी मागणी पुढे येत आहे. पाऊस अजूनही थांबलेला नाही. आजही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.