Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार

Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार

Cyclone Michaung : भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वादळाच्या तडाख्याने मुसळधार पाऊस होत असून या पावसामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करत मदतीचे आश्वासन दिले. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ दाखल झाल्याने मुसळधार पाऊस होत आहे. आता आज हे वादळ आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टीवर धडकू शकते. आज नेल्लोर ते मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचं थैमान; विमाने, रेल्वे गाड्या रद्द, सतर्क राहण्याच्या सूचना

तामिळनाडूत थैमान घातल्यानंतर आता हे चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशातील बापटला किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनसीमा आणि काकीनाडा या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चक्रीवादळ आज डिसेंबर रोजी आंध प्रदेशातील किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यावेळी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केंद्र शासानाने एनडीआरएफच्या २१ टीम तैनात केल्या आहेत. तसेच ‘मिचौंग’चक्रीवादळामुळे 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या परिसरात 35 ते 80 किमी वेगाने वारे वाहत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी 1913 हा क्रमांक राज्य सरकारने दिला आहे. राज्यात मंगळवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पश्चिम मध्ये आणि जवळच्या दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर, दक्षिण आंध्र प्रदेशचा किनारा आणि तामिळनाडूतील उत्तर भागात घोंगावत आहे.

Firecracker Blast : तामिळनाडूत फटाका कारखान्यांत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube