Cyclone Michaung : ‘मिचौंग’ चक्रीवादळाचं थैमान; विमाने, रेल्वे गाड्या रद्द, सतर्क राहण्याच्या सूचना

Cyclone Michaung : ‘मिचौंग’ चक्रीवादळाचं थैमान; विमाने, रेल्वे गाड्या रद्द, सतर्क राहण्याच्या सूचना

Cyclone Michaung : भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रीवादळाने(Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोणत्या गाड्या रद्द केल्या?
चेन्नई-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस ४ डिसेंबर रोजी रद्द, उद्या 5 डिसेंबरला हजरत निजामुद्दीन गाडीही रद्द
चेन्नई-हजरत निजामुद्दीन जीटी एक्स्प्रेस ४ डिसेंबर रोजी रद्द, तर 7 डिसेंबर रोजी हजरत निजामुद्दीन येथूनही रद्द
चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस 4 डिसेंबर रोजी रद्द, तर ही ट्रेन 5 आणि 6 डिसेंबरला नवी दिल्लीहूनही रद्द
तिरुअनंतपुरम-नवी दिल्ली केरळ एक्सप्रेस ४ डिसेंबर रोजी रद्द, तर 5 आणि 6 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथूनही रद्द
मदुराई-हजरत निजामुद्दीन तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेस ५ डिसेंबरला रद्द तर 7 डिसेंबर रोजी हजरत निजामुद्दीन येथूनही रद्द
मदुराई-चंदीगड सुपरफास्ट एक्स्प्रेस ३ डिसेंबरला रद्द, ही ट्रेन ४ डिसेंबर रोजी चंदीगडहून रद्द करण्यात आली होती.
तिरुनेलवेली-श्री माता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस 4 रद्द करण्यात आली. 7 रोजी श्री माता वैष्णोदेवी कटरा येथून रद्द होणार आहे.

Mizoram Election 2023 : मिझोरामध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल? MNF सत्ता शाबुत ठेवेल का?

चक्रीवादळ पाच डिसेंबर रोजी आंध प्रदेशातील किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यावेळी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केंद्र शासानाने एनडीआरएफच्या २१ टीम तैनात केल्या आहेत. तसेच ‘मिचौंग’चक्रीवादळामुळे 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

दरम्यान, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या परिसरात 35 ते 80 किमी वेगाने वारे वाहत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी 1913 हा क्रमांक राज्य सरकारने दिला आहे. राज्यात मंगळवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube