Download App

Weather Update : राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस ‘या’ भागांमध्ये उष्णता वाढणार

Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण या भागात पुढील तीन दिवस म्हणजे 14 मे पर्यंत उष्णता वाढून अस्वस्थाता जाणवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतर हवामान पुर्ववत होईल. असं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे.

ED notice : चौकशीसाठी वेळ वाढवून देण्यात द्यावा, जयंत पाटलांची ईडीकडे मागणी

दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मोखा चक्रिवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या वादळाचा कोणताही परिणाम राज्यात होणार नाही. असं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र यामुळे राज्यात उष्णता वाढणार असल्याने उष्माघाताचं प्रमाण वाढणार आहे.

Elon Musk सोडणार ट्विटरचं सीईओ पद, ‘ही’ असणार नवी सीईओ

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 अंशांची वाढ झाली आहे. तर आता हा पारा चाळीशी पार जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.

Tags

follow us