3 महिन्यांत 21 हजारांवरून थेट टॉप 100 मध्ये! MPSC च्या निकालाने खळबळ, मेहबूब शेख यांचे गंभीर आरोप
MPSC मध्ये नेमकं काय घडलं? विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? असा सवाल देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.
MPSC FDA Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरतीचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. आमदार रोहित पवारांनंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत गंभीर सवाल केले आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वी परीक्षेत 21, 222 वा नंबर आणि एफडीएच्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान असल्याचा गंभीर आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे. तसेच या परीक्षेतील निकालाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीचीही मागणी शेख यांनी केली आहे.
आमचा कोणत्याही उमदेवाराविरुद्ध वैयक्तिक आक्षेप सून आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, परंतू पारदर्शकता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे. डिसेंबर 2025 मध्ये FDA Chemical Analyst परीक्षा झाली आणि त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी मार्च 2026 मध्ये Drugs Inspector परीक्षा झाली.या दोन्ही परीक्षांच्या निकालांमधील काही उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं शेख यांनी म्हटलंय. या पोस्टमध्ये शेख यांनी तीन विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन सवाल उपस्थित केले आहेत.
1) पायल लांडे
FDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210
Drugs Inspector – Rank 31
2) ऋतुजा अमृत पाटील
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21222
Drugs Inspector – 155 गुण | Rank 7
3) सागर रामलिंग थिटे
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21160
Drugs Inspector – 150 गुण | Rank 14
मेहबूब शेख यांच्या कोणत्या मागण्या?
-Drugs Inspector परीक्षेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
– आवश्यक असल्यास डिजिटल फॉरेन्सिक, सर्व्हर लॉग्स आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात यावी.
-चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहील.
खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?
अवघ्या तीन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या रॅंकमध्ये बदल…
अवघ्या तीनच महिन्यांत विद्यार्थ्यांच्या कालावधीत हजारोंच्या रॅंकमधून राज्यातील अव्वल क्रमांकापर्यंत झालेला हा बदल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न करीत आहेत. तसेच काही उमेदवारांचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. फोटोंवरुन कोणालाही दोषी ठरवता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलंय.
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल का? विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? हे प्रश्न मोजक्या विद्यार्थ्यांचा नाही, असे अनेक सवाल शेख यांनी केले आहेत.