Download App

Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढत असतानाही काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने वाट पहावी लागली. मात्र येत्या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Rain Alert : आजही अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम आता कमी झाला आहे. राज्यात ढगाळ हवामान गायब झाले आहे.  पावसाचा जोरही कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही.  या चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान स्वच्छ राहिल. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील काही राज्यांत अवकाळी पाऊस होईल. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, लक्षद्वीप या राज्यात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल.

Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव..

राज्यात पावसाचा जोर ओसरला असून थंडीत वाढ झाली आहे. तरी देखील काही भागांत अजूनही ढगाळ हवामान आहे. तसेच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड थंडी असते. त्यानंतर थंडी कमी होत जाते. अशा हवामानाचा अनुभव नागरिक सध्या घेत आहेत.

 

Tags

follow us