भक्ताकडून साईंना 46 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण

शिर्डी : नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे. दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

शिर्डी : नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे.

दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये साईचरणी तब्बल 400 कोटींचे दान जमा झाले होते.

राज्यात कोरोनानंतर शिर्डी येथील साईंच्या दरबारात भक्तांची गर्दी वाढली असून दानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.

नव वर्ष साईच्या सानिध्यात साजरे करण्यासाठी साईभक्त उत्सुक असतात. त्यामुळे दरवर्षी साईदबारी साईभक्तांची मांदीयाळी असते. त्यात अनेक साईभक्तांकडून साईंच्या तिजोरीत भरभरून दान टाकले जाते.

Exit mobile version