NCP चा 24 वा वर्धापन दिन : संग्राम जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला येत्या 10 जून रोजी 24 वर्ष पूर्ण होत असून पक्ष आता 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. (24th anniversary of NCP will be held in Ahmednagar) वर्धापण दिनाआधी राष्ट्रवादीचा 9 जूनला मेळावा देखील नगर शहरात होणार आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (9)

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (9)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला येत्या 10 जून रोजी 24 वर्ष पूर्ण होत असून पक्ष आता 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. (24th anniversary of NCP will be held in Ahmednagar)

वर्धापण दिनाआधी राष्ट्रवादीचा 9 जूनला मेळावा देखील नगर शहरात होणार आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरमध्ये वर्धापण दिन सोहळ्याची आढावा बैठक घेऊन मैदानाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील जयंत पाटील यांच्यासोबत होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून राज्याची पुढची दिशा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना नवा प्रतोद नेमणार; ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेची खेळी

संग्राम जगताप यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील एका बैठकीत जाहीर केलं की, यंदा राष्ट्रवादीचा वर्धापण दिन नगरला साजरा केला जाईल. राष्ट्रवादीला 24 वर्ष झाले, आणि राष्ट्रवादी 25 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. राष्ट्रवादीचा वर्धापण दिन हा नगरमध्ये होतो आहे, ही नगरसाठी फार मोठी बाब आहे. या माध्यमातून नगरचं नाव आणखी उंचावेल, या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची पुढची ध्येय धोरणं, पुढची वाटचाल हे ठरणार आहे. या मेळाव्यातून राज्याची पुढची दिशाही ठरेल, असं आमदार जगताप यांनी सांगितलं.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याची निवड का करण्यात आली, अशी चर्चा राजकीय सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघही अहमदनगर जिल्ह्यात येतो. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार यांच्यावर राष्ट्रवादीकडून काही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे का? अशा चर्चा सुरू आहेत.

Exit mobile version