नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांना सुनावले
14 डिसेंबर 2022 रोजी लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे आयोजन सकल हिंदु समाजाच्यावतीने करण्यात आलं होतं. मोर्चाच्या समारोपावेळी आयोजित केलेल्या सभेत कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या मोर्चासाठी गुजरातच्या काजलदीदी हिंदुस्थानीदेखील उपस्थित होत्या.
‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?
कालीचरण महाराजांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून कालीचरण महाराज यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालीचरण महाराज येत्या 12 मे रोजी नगर तालुक्यातील शेंडी गावात एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत.
याआधीही कालीचरण महाराजांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केले आहेत. रायपूरच्या सभेतही त्यांनी महात्मा गांधीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने जवळपास ते 95 दिवस अटकेत होते. त्यानंतरही त्यांनी वारंवार वादग्रस्त विधाने केल्याचं दिसून आलं आहे.