Download App

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जवानाला 5 वर्षांची शिक्षा

अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जवानाला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर

रोनी रविंद्रनाथ मंडल असं या आरोपीचं नाव असून या आरोपीने रात्रीच्यावेळी पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले होते. याबाबत पीडित मुलीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

पीडित मुलीने गुन्हा दाखल केल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीविरोधात कारवाई केलीय. त्यानंतर या घटनेच्या तपासी अधिकारी वैशाली गायकवाड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात सर्व पुराव्यासह दोषारोपपत्र सादर केलं.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना

या घटनेप्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून रेकॉर्ड आणि कागदोपत्री पुराव्याची शहानिशा करुन सरकारी वकील अर्जुन पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला आहे.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद आणि पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला दोषी ठरवित पाच वर्षे सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये दंड तसेच कलम ४५१ नुसार 1 वर्षे शिक्षा आणि 1 हजारांची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Tags

follow us