अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेतर्फे दिला जाणारा ‘स्व.सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार’ यावर्षी अहमदनगर येथील प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक व अभिनेते अभिजित दळवी यांना लेखिका, रंगकर्मी तथा सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नोरा फतेहीचा मराठमोळा लूक पाहिलात का?
स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या जयंती दिनी गुरुवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता सी. एस. आर. डी. येथील सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक प्रा. मकरंद खेर, सदाशिव अमरापूरकर यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर, कन्या तथा दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर, उपाध्यक्ष भगवान राऊत, सहकार्यवाह भाऊसाहेब काळे आदी उपस्थित होते.
अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिभावान रंगकर्मीला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. अभिजित दळवी यांच्या ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून ‘ कालसर्प’ या त्यांच्या लघुपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.
या कार्यक्रमास सी. एस. आर. डी. चे प्राचार्य सुरेश पठारे, सुधीर लंके, प्रा. मकरंद खेर, राजाभाऊ अमरापूरकर, दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.