Download App

बसच्या बेलदोरीनंतर आता महिलांच्या हाती स्टेअरिंग; अकोले आगारात पहिली चालक रुजू

राज्य परिवहनच्या सेवेत आता महिला चालक सुद्धा रुजू झाल्या असून आज अहमदनगरच्या अकोले बस आगारात इतिहासात पहिल्यांदाच एक महिला चालक रुजू झालीय. अहमदनगरसह विविध जिल्ह्यातील बस आगारात महिला चालक रुजू झाले आहेत.

‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर

अकोले बस आगारात चालक म्हणून रुजू झालेल्या सोनाली माधव भागडे यांनी अथक परिश्रम घेत ही नोकरी मिळवलीय. त्यांनी आजच्या पहिल्याच दिवशी अकोले ते संगमनेरपर्यंत एसटीचे स्टेरिंग हाती घेत यशस्वी फेरी मारलीय. सोनाली भागडे यांची 2019 च्या भरती प्रक्रियेत महिला चालक पदासाठी निवड झाली आहे.

Ashadhi Wari : आषाढी एकादशीच्या दिवशी VIP दर्शन बंद; पालकमंत्री विखेंचा मोठा निर्णय

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 206 महिला चालकांची निवड करण्यात आली होती. त्यातील 28 जणांची भरती करण्यात आली. या महिला चालकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले तर ज्यांच्याकडे परवाना नव्हता त्यांनी एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर महिला चालक आगारात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, या बस आगारात पहिल्यांदाच एक महिला चालक आणि ग्रामीण आदिवासी भागातील लढवय्यी तरुणी म्हणून सोनाली भागडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा बाळासाहेब ताजणे, बाळासाहेब नाईकवाडी, दत्ता नवले, अण्णासाहेब ढगे यांनी सन्मान केला आहे.

Tags

follow us