Download App

जुन्या पेन्शनसाठी आमदार संग्राम जगताप आक्रमक; म्हणाले, ‘मीही पेन्शनचा लाभार्थी’

अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या (old pension) मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भविष्यात मीही पुढे जाऊन पेन्शनचा लाभार्थी आहे, असे ते म्हणाले.

अहमदनगर (Ahmadnagar) शहरातील न्यु आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनस्थळी आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते होते. या प्रसंगी आमदार जगताप म्हणाले, शिक्षकांनी वर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिक्षक हा समाजाचा पाया आहे. देशात फक्त युवकांची संख्या जास्त अजून चालणार नाही. तर त्याला योग्य दिशा असणे आवश्यक आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन फक्त शिक्षकच देऊ शकतात.

Marathi Drama : नाट्यासृष्टीच्या सक्षमीकरणासाठी रंगकर्मी नाटक समुहाने कसली कंबर

ते पुढे म्हणाले की, पेन्शन घ्यायला कोणालाही विरोध नाही. पूर्वीपासूनची सामाजिक व्यवस्था बंद करण्याचे काही कारण नाही. आम्हीही भविष्यात पेन्शनचे लाभार्थी आहोत. खासदार असो, आमदार असो. एकदा पाच वर्ष पूर्ण झाले की तो पुढे आमदार होवो अथवा नाही त्याला पेन्शन सुरू होते. पेन्शन घ्यायची वेळ तुमच्यावरच काय बऱ्याच जणांवर येईल. तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत समाजाला सेवा द्यावी लागते. तुम्हाला सक्षम पिढी घडवावी लागते. त्यामुळे तुमचे प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घ्यायला हवेत. तुमचे प्रश्न मी आणि अनेक आमदारांनी राज्य सरकारसमोर मांडल्या आहेत. केवळ आंदोलन करून नका तर आंदोलनात फुट पाडणाऱ्यांपासून सजग रहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Tags

follow us