अहमदनगरमध्ये राडा करणारे 19 आरोपी ताब्यात…

अहमदनगर : अहमदनगर शहरात काल रात्री दहा वाजता दोन ठिकाणी दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 19 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’ राकेश […]

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime

अहमदनगर : अहमदनगर शहरात काल रात्री दहा वाजता दोन ठिकाणी दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 19 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’

राकेश ओला म्हणाले, नगर तालुक्यातील वारुळवाडी येथे दोन गटांत वाद झाला. त्यातील एका गटाने मित्र बोलावले. त्यामुळे दोन्ही गटांत पुन्हा हाणामारी झाली. यात एक चारचाकी व दोन दुचाकींची नुकसान करण्यात आली.

‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या

या प्रकरणी दोन फिर्यादी घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. रस्ता अडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जिवितास धोका पोहोचवणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

धक्कादायक ! महिलेवर बंदूक रोखत सराफा दुकानात दरोडा; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

19 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील माहितीवरून आणखीही काही जणांचा शोध सुरू आहे. दोन गटांत झालेल्या वादात कोठेही दगडफेक झालेली नाही. मोटार सायकल घसरण्यावरून हा वाद झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले.

दरम्यान, आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच शहरात शांतता राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version