Download App

अहमदनगर पोस्ट ऑफिसच्या अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे

  • Written By: Last Updated:

अहमदनगर: अहमदनगर पोस्ट ऑफिस (डाकघर) प्रवर अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिसमधून डाक सहायक यापदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट यापदी त्याची निवड झाली व डाक निरीक्षक म्हणून धाराशिव येथून त्यानी आपल्या प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला.उपविभागीय डाक निरीक्षक उमरगा,भुसावळ,रेल्वे मेल सर्व्हिस छत्रपती संभाजीनगर,बीड,धाराशिव, नाशिक डाक विभागात त्यानी सक्षमपणे काम पाहिले आहे. एक शिस्तप्रिय,अभ्यासू, कामगार प्रिय अधिकारी म्हणून ओळख ओळख आहे.त्यानी सिनीयर पोस्टमास्तर सुरत (गुजरात) येथे काही काळ काम पाहिल्यानंतर त्याची सिनियर पोस्टमास्तर छत्रपती संभाजी नगर येथे पोस्टिंग झाली.मागील वर्षी त्याना छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार संघाचे वतीने दिला जाणारा युवा गौरव पुरस्कार देऊन जिल्हाधिकार दिपकजी मुंगळीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले होते.
श्री छत्रपती संभाजीनगर येथून त्याची प्रमोशनवर प्रवर अधीक्षक डाकघर अहमदनगर यापदी झाली आहे.

सुरेश बन्सोडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. त्यांचा नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष व अहमदनगर विभागाचे नेते संतोष यादव यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप कोकाटे,बापू तांबे,अमोल साबळे, नामदेव डेंगळे,कमलेश मिरगणे, तान्हाजी सूर्यवंशी,प्रदिप सूर्यवंशी, सुनिल थोरात,दिपक नागपुरे,विजय दरदले,नितीन थोरवे,सागर कलगुंडे, भाऊसाहेब जाधव,नितीन खेडकर,सागर कलगुंडे,सागर पंचारिया, अर्चना भुजबळ, रंजना कदम,आसिफ शेख, आश्विनी चिंतामणी,संतोष घुले,नामदेव डेंगळे उपस्थित होते.

Tags

follow us