Download App

अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर नवीन कार्यकारिणीची निवड

अहमदनगर : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे.

अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपीठावर अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. तर, सभेला सुमारे ९० सभासद उपस्थित होते.

Maharashtra Politics : संजय राऊतांना शहाजीबापू पाटलांचा विषारी टोला…

सुमारे ३० वर्षानंतर अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक पदाधिकारी व सदस्य तसेच शहरातील विविध माध्यमांतील पत्रकार एकत्र आले. प्रेस क्लबची स्थापना झाली तेव्हा नगरमध्ये मोजकीच वर्तमानपत्र होती.

Sharad Pawar यांनी झटकले हात : मला धनुष्यबाणाच्या वादात पडायचे नाही

अलीकडच्या काळात माध्यमांचा विस्तार झाला. त्यामुळे प्रेस क्लबमध्ये सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना स्थान मिळावे, हा विचार पुढे आला. त्यानुसार आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तरुण सदस्यांना स्थान देणारी नवी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.

IND vs AUS 2nd Test: अश्विन – जडेजाच्या फिरकीच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला दारुण पराभव

संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी लवकरच धोरणात्मक बदल करण्याची सभेत सहमती झाली. निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये विठ्ठल लांडगे यांची अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सुशील थोरात, विजय माने, सरचिटणीसपदी सुभाष मुदळ, खजिनदार प्रदिप पेंढारे, सहचिटणीस लैलेश बारगजे तर कार्यकारिणी सदस्यपदी लहु दळवी, अशोक परुडे, शिल्पा रसाळ, मुरलीधर तांबडे, आफताब शेख, जी.एन. शेख, विजय सांगळे यांची निवड करण्यात आली आहे.

सभेची सुरुवात करण्यापूर्वी दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभेच्या कामकाजाला ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सर्वात प्रथम मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर सभेसमोर आलेले सर्वविषय एकमताने मंजूर करण्यात आले.

सभेला ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाडेकर, मन्सुर शेख, शिरीष कुलकर्णी, विजयसिंह होलम, अनिल शहा, श्रीकांत वंगारी, आप्पासाहेब शेळके, अन्सार सय्यद, सागर दुस्सल, मयुर मेहता, कुणाल जायकर, संदीप खोटे, प्रशांत पाटोळे, आदिनाथ शिंदे, अशोक तांबे, रविंद्र कदम, तुकाराम कामठे, भास्कर कोडम, संतोष आवारे, सुधीर पवार, राहुल शेळके, अमोल भिंगारदिवे, सागर गोरखे, प्रविण सुरवसे, कुलदीप कुलकर्णी, विक्रम बनकर, मुकुंद भट, यतीन कांबळे, सचिन कलमदाणे, सौरभ गायकवाड, प्रविण संकपाल, अन्वर इकबाल शेख, सागर म्हस्के, विक्रम लोखंडे, इकबाल शेख, सचिन शिंदे, स्नेहा जोशी, शाहरुख शेख, वैशाली टेमकर, कविता भारद्वाज, मनिष कांबळे, उमर सय्यद, विजय मते, शबीर सय्यद, दिपक रोकडे, अतुल लहारे, अमर सय्यद, गोरख शिंदे, प्रशांत शिंदे, कबीर बोबडे, श्रीकांत खांदवे, गीताराम शिंदे, स्वामिनी मुंगीकर, सय्यद शफी, खान आसिफ, वाजिद शेख, उदय जोशी, संदीप दिवटे यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.

Tags

follow us