IND vs AUS 2nd Test: अश्विन – जडेजाच्या फिरकीच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला दारुण पराभव

  • Written By: Published:
IND vs AUS 2nd Test: अश्विन – जडेजाच्या फिरकीच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला दारुण पराभव

दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या कसोटीच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती निश्चितच मजबूत केली होती, मात्र तिसर्‍या दिवसाचे पहिले सत्र त्यांच्यासाठी खूपच खराब झाले आणि ते टीम इंडियाला मोठे लक्ष्य देऊ शकले नाहीत. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व होते

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजा (81) आणि पीटर हँड्सकॉम्ब (72) धावा शिवाय दुसरा कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 263 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने 4 आणि जडेजा आणि अश्विनने 3-3 बळी घेतले. यानंतर पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या होत्या.

Sushma Andhare : यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र 

 

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ताकद दाखवली

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले. 139 धावांवर 7 गडी गमावल्याने भारतीय संघ कठीण परिस्थितीत अडकला होता, परंतु येथून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी 114 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला संजीवनी दिली. या भागीदारीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 5 तर टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमनने 2-2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला केवळ एक धावांची आघाडी मिळाली तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांच्या फलंदाजांनी एक गडी गमावून 61 धावा केल्या होत्या. म्हणजेच एकूण आघाडी 62 धावांची झाली. येथे ऑस्ट्रेलिया संघाने कसोटीत आपली पकड मजबूत केली.

तिसऱ्या दिवशी अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू

तिसरा दिवस भारतीय फिरकी पट्टू अश्विन आणि जडेजा यांनी गाजवला. अश्विन-जडेजाच्या फिरकीपुढे कांगारूंनी माना टाकल्या ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 113 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 43 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लाबुशेन याने 35 धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजा सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी कारकीर्दीतील विकेट्सचे 12वे पंचकही पूर्ण केले. त्याच्यासोबतच, आर अश्विन यानेही 3 विकेट्स नावावर केल्या.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube