Ahmednagar Rain : उकाड्याने हैराण झालेल्या अहमदनगरकरांसाठी सुखद बातमी!

Ahmednagar Rain : उकाड्याने हैराण झालेल्या अहमदनगरकरांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात येत्या 8 ते 10 जूनदरम्यान, विजेच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि 11 जून रोजी रिमझिम पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी, महेश तापसेंनी दिला 24 तासाचा अल्टीमेटम… वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी […]

Ahmednagar Rain Images

Ahmednagar Rain Images

Ahmednagar Rain : उकाड्याने हैराण झालेल्या अहमदनगरकरांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात येत्या 8 ते 10 जूनदरम्यान, विजेच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि 11 जून रोजी रिमझिम पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी, महेश तापसेंनी दिला 24 तासाचा अल्टीमेटम…

वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केलं आहे.

सुई-दोऱ्यापासून जेवण्याचा भांड्यांपर्यंत… माऊलींच्या पालखीची तयारी कुठे पर्यंत आली?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सूचना जारी :

▪️ नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये.
▪️ धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
▪️ वीज चमकताना विद्यूत उपकरणांचा वापर टाळा.
▪️ वीज चमकताना शेतीच्या अवजारांपासून दूर रहावे.
▪️ मोकळ्या जागेवर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसू नये.
▪️ शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी वेळीच नियोजन करावे.
▪️ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.
▪️ आपत्तकालीन परिस्थितीत नजीकच्या प्रशासनिक कार्यालयात संपर्क साधावा.

दरम्यान, आज अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून एका आठवड्यानंतर केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 16 जूननंतर मान्सूनचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Exit mobile version