Download App

Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणांचा धिंगाणा…

अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागातील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा प्रकार घडला. दर्ग्याच्या उरुसादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (youth riotby taking photo of aurangzeb at ahmednagar)

पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला

फकिरवाडा परिसरात असलेल्या हजरत दम्मा हरी दर्ग्यात सालाबादाप्रमाणे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. चादर अर्पण करण्यासाठी मुकुंदनगर भागातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी तरुणांनी हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या…

दरम्यान, हा प्रकार भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. तरीही या प्रकरानंतर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून अहमदनगर शहरातील कापड बाजारात परिसरांत एका व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ला झाल्याची घटना घडली. त्यानंतर राजकीय नेत्यांनी अहमदनगरमध्ये येऊन पीडितांची भेट घेतली होती. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पीडिताची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या छोटेखानी सभेत दोन समाजात निर्माण होईल, असं विधान केलं असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला होता.

Tags

follow us