Download App

अक्षयला न्याय मिळला पाहिजे, सरकारच्या निषेधार्थ रिपाईचे मुंडन आंदोलन

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – महाराष्ट्रात जातीय अत्याचारामध्ये झालेली वाढ व अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) खून प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) (Republican Party of India) वतीने शहराच्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करण्यात आले. रिपाईच्या पदाधिकार्‍यांनी मुंडन करीत सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. (Akshay Bhalerao should get justice, Mundan movement for reparations in protest of Govt)

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील निर्दयी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, त्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि या घटनेचा प्रमुख सूत्रधार शोधावा, अशी मागणी करण्यात आली.

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या युवकाची हत्या करण्यात आली. जातीय द्वेषातून ही हत्या झाली आहे. ही निंदणीय आणि परिवर्तनवादी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. मात्र, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची साधी दखलही घेतली नाही. सरकारच्या वागण्यातून जातीयवादी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याचा आरोप रिपाईच्य वतीने करण्यात आला.

शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? : कोल्हापुरातील वातावरण तापलं 

खून झालेल्या अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयाची मदत करून त्या कुटूंबाचे पुनर्वसन करावे, त्या कुटूंबास पोलीस संरक्षण द्यावे, कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देऊन त्यांना न्याय मिळावा, हा खटला जलदगती न्यायालयाच चालवण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.

या आंदोलनात रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, भिम वाघचौरे, नईम शेख, जमीर इनामदार, निजाम शेख, सुफीयान शेख, आवेज काझी, बंटी बागवान, जमीर सय्यद, राकेश चक्रनारायण, हुसेन चौधरी, आदिल शेख, इम्रान शेख, अरबाज शेख, मुन्ना भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags

follow us