Anna Hazare : नगर जिल्हा नामांतराला अण्णांचा पाठिंबा, ‘मी सदैव तुमच्यासोबत’

अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले. नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज […]

Untitled Design F

Untitled Design F

अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले.

नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज दुसऱ्या दिवशी रथयात्रा श्रीगोंदा पारनेर मार्गे जात असताना राळेगणसिद्धी येथे पोहचली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

अहमदनगर जिल्ह्याला ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर’ असे नाव देण्यात यावे, या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अण्णांची भेट घेतल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. अण्णांनी सर्वांचे स्वागत केले, या तुमच्या लढ्यासोबत मी सदैव आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतरासाठी योग्य भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो असे सांगितले.

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांची 31मे रोजी होणारी जयंती साजरी करण्यापूर्वी नामांतर झाले नाही, तर कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला. आगामी अधिवेशनादरम्यान हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version