विखे-कर्डिलेंना धक्का, तनपुरेंचे उमेदवार आघाडीवर

Apmc Election: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसेवा मंडळ १६ जागांवर पुढे आहे. तर विखे-कर्डिले यांचे […]

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Apmc Election: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसेवा मंडळ १६ जागांवर पुढे आहे. तर विखे-कर्डिले यांचे मंडळ हे दोन जागांवर आघाडीवर आहेत. त्यात जनसेवेचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. विखे-कर्डिले गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात काही जागांवर एकदम कमी फरकाने विखे यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे विखे गटांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यानुसार फेर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी १८ संचालकांसाठी आजच मतदान झाले आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू झालेली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Exit mobile version