Download App

Vikhe-Kardile यांना मोठा धक्का, Prajakt Tanpure यांनी बाजार समिती ठासून आणली !

  • Written By: Last Updated:

Apmc Election Rahuri : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे (Sujay vikhe) व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मंडळाने तब्बल सोळा जागा जिंकल्या आहेत. विखे व कर्डिले प्रणित मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहेत. विखे-कर्डिले मंडळातील अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सामाजिक कार्यकर्ते पोटेंना शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज जोरदार चुरसीचे मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या बाजार समितीमध्ये अठरा संचालक आहेत. त्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला १६ जागा मिळाल्या आहेत. विखे-कर्डिले प्रणित तालुका विकास मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानवे लागले आहेत. त्यात काही जागांवर एकदम कमी फरकाने विखे-कर्डिले यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे विखे गटांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.

Ahmednagar : नागरिकांनाे सावधान! पुढील पाच दिवस असणार अवकाळी संकट

विखे-कर्डिले गटाचे सत्यजित कदम, शामराव निमसे हे दोघे विजयी झाले आहेत. ते ही अवघ्या दोन मतांनी विजय झाला आहे. तर विखे गटाचे नारायण सोनवणे यांचा २ मतांनी पराभव झाला आहे. विखे यांचे खंदे समर्थक असलेले वांबोरीतील उदय पाटील यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे.

ही बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी विखे-कर्डिले यांनी जोरदार ताकद लावली होती. विखे यांनी तनपुरे घरावर वैयक्तिक आरोपही केले होते. तसेच तनपुरे यांच्या मागील संचालक मंडळातील चार संचालकही फोडले होते. राहुरीतील अनेक स्थानिक नेत्यांना हाताशी धरले होते. विखेंना कर्डिले यांची मोठी साथ होती. त्यानंतरही विखे-कर्डिले यांच्या गटाला दोनच जागा मिळाल्या आहेत. हा दोघांसाठी मोठा धक्का आहे. त्याचा परिणाम आगामी राजकारणात दिसणार आहे.

उद्या नगर, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतमोजणी आहे. नगरमध्येही विखे-कर्डिले यांनी ताकद लावलेली आहे. तर पारनेरमध्ये खासदार सुजय विखे यांनी ताकद लावलेली आहे. त्याकडेही आता राजकीय लक्ष लागले आहे.

तनपुरे गटाचे विजयी उमेदवार: सोसायटी मतदारसंघ- अरुण बाबुराव तनपुरे सर्वाधिक 814, दत्तात्रय यादवराव कवाने 684 , बाळासाहेब रखमाजी खुळे -724, रखमाजी बन्सी जाधव-696, महेश केरू पानसरे -714, नारायण धोंडीराम सोनवणे -663, महिला गटातून सुनिता रावसाहेब खेवरे – 808, शोभा सुभाष डुकरे-709,
रामदास परसराम बाचकर -763, शेतकरी प्रतिनिधी सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग दत्तात्रय निवृत्ती शेळके-697, शेतकरी प्रतिनिधी ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघ -शारदा किसन आढाव-458, मंगेश जालिंदरनाथ गाडे -478

शेतकरी प्रतिनिधी: ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मधुकर प्रभाकर पवार- 466,
आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी-गोरक्षनाथ तुकाराम पवार :443, व्यापारी आडते प्रतिनिधी मतदारसंघ चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ -308,
सुरेश लाल बन्सीलाल बाफना-312 हमाल मापारी मतदार संघ मारुती रंगनाथ हारदे-171
सोसायटी मतदार संघातून सत्यजित चंद्रशेखर कदम व शामराव शंकरराव निमसे हे विखे गटाकडून विजयी झाले.

Tags

follow us