Download App

APMC Election : कंडका कोणाचा पडणार? विखे, कर्डिले, थोरात, पवारांची प्रतिष्ठ पणाला

  • Written By: Last Updated:

APMC Election : नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहिला मिळाली आहे. दोन ठिकाणचे किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी शुक्रवारी शांतेत मतदान पार पडले. या बाजार समित्यांसाठी सरासरी 98 टक्के मतदान झाले आहे. नगर, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, पाथर्डी या सात बाजार समित्यांची मतमोजणी उद्या, शनिवारी होत आहे. तर राहुरीची मतमोजणी आज झाली. त्यात प्राजक्त तनपुरे यांनी बाजी मारली. बाजार समित्यांच्या निवडणुकीत जोरदार राजकीय धुराळा उडाला होता. त्यात आरोप-प्रत्यारोप झाले. कोल्हापूरमधील साखर कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कंडका कोणाचा पडणार, याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले,आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Cm Eknath Shinde : पोलिसांकडून लाठीचार्ज झाला नाही, राजकारणासाठी राजकारण करु नका…

गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या ताब्यात असलेल्या अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ९८. ९२ टक्के मतदान झाले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते एकवटले होते. मतदानावरून कर्डिले समर्थक व महाविकास आघाडीचे समर्थक यांच्यामध्ये मतदान केंद्रावर वादावादी झाली होती.

पाथर्डी बाजार समितीच्या मतदानाच्या वेळी आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाला आहे. या ठिकाणी ९६. ७७ टक्के मतदान झाले. तर संगमनेर बाजार समितीसाठी ९६. ८८ टक्के मतदान झाले. या ठिकाणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महसूल मंत्री विखे यांच्या पॅनेलमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. विखे यांनी पहिल्यांदा थोरात यांच्याविरोधात पॅनल दिला आहे.

बाजार समिती निवडणूक; ढाकणे-राजळे गटांत शाब्दिक चकमक

श्रीगोंदा बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान झाले असून, या ठिकाणी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे एकत्र आले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी माजी आमदार राहुल जगताप व इतर स्थानिक नेते एकत्र आलेले आहेत.

राहुरी बाजार समितीमध्ये ९८. ८१ टक्के मतदान झाले आहेत. या ठिकाणी माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात ही बाजार समिती आहे. ही बाजार समिती हिसकाविण्यासाठी खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी ताकद लावली होती. परंतु तनपुरे यांनी १६ जागा जिंकत बाजार समिती ताब्यात घेतली आहे. पारनेरमध्ये ९८. ३१ टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे एकत्र आले आहे. खासदार सुजय विखे यांनी येथे ताकद लावली होती.

कर्जत बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे पॅनलेमध्ये जोरदार लढत आहे. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आपल्या पॅनेलमध्ये घेत पवारांना धक्का दिला होता. या बाजार समितीसाठी ९८.४५ टक्के मतदान झाले आहेत. मतदार सांभाळण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. त्यात काही जणांनी मतदार थेट सहलीला पाठविले होते. हे मतदार थेट मतदान केंद्रावर बसेसमधून आणण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी लक्ष्मीदर्शन, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहेत. त्यामुळे मतमोजणीत कोणाच्या बाजूने कौल हे, कोणाचा कंडका पडणार हे उद्या मतमोजणीत समोर येईल.

Tags

follow us