Download App

शेतकऱ्यांनो, उद्यापासून ‘या’ कारणामुळे अहमदनगर बाजार समिती तीन दिवस बंद

  • Written By: Last Updated:

Saint Nivrittinath Maharaj Dindi : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. यंदाही अनेक पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivrittinath Maharaj) पालखी व दिंडी सोहळा बुधवारी (14) अमहनदनगर शहरात येत आहे. त्यामुळं अहमदनगर बाजार समिती उद्यापासून पुढचे तीन दिवस बंद असणार आहे. (Arrival of Saint Nivrittinath Maharaj palkhi in Ahmednagar tomorrow, market committee closed for two days)

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची परंपरा आजही कायम आहे. रामकृष्ण हरी…. जय जय राम कृष्ण हरी… विठोबा रखुमाई…. जय जय विठोबा रखुमाई… असा विठुरायाचा गजर करत ही पालखी नाशिकहून आषाढी वारीसाठी निघाली आहे. नाशिकमधून ही पालखी आता अहमदनगरकडे मार्गस्थ झाली आहे. या पालखीत शेकडो भाविक सहभागी झाले असून ही पालखी उद्या अहदमनगरमध्ये दाखल होणार आहे.

शहरातील बाजार समितीत बुधवार व गुरुवार (दि. 15) असे दोन दिवस ही दिंडी राहणार आहे. शुक्रवारी (दि. 16) रोजी ही पालखी व दिंडी पंढरपूरकडे निघणार आहे. त्यामुळे बुधवारपासून 14, 15 आणि 16 जून असे तीन दिवस बाजार समितीतील भुसार, कडबा, फळ व भाजीपाला बाजार बंद राहणार आहेत.

Shivsena Advertisement : ‘जाहिरातीमध्ये फडणवीसांचा फोटो नसला तरी आम्ही लोकांच्या मनात’

फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी या कालावधीत आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, शहर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार संकुलात कांद्याचे लिलाव नियमितपणे सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपाध्यक्ष रभाजी सूळ यांनी सांगितले आहे.

Tags

follow us