Rahibai Popere : दारूबंदीसाठी बीजमाता रस्त्यावर, थेट सरकारलाच घातलं साकडं

अहमदनगर : पद्मश्री किताबाने सन्मानित असलेल्या तसेच बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोपरे या थेट आता रस्त्यावर उतरल्या आहेत. अकोले तालुक्यात ग्रामीण भागात सर्रास पाणे दारूची खुल्याआम विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य परिवारांचे कुटुंब उध्वस्त होत चालल्याचे […]

Untitled Design (46)

Untitled Design (46)

अहमदनगर : पद्मश्री किताबाने सन्मानित असलेल्या तसेच बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोपरे या थेट आता रस्त्यावर उतरल्या आहेत.

अकोले तालुक्यात ग्रामीण भागात सर्रास पाणे दारूची खुल्याआम विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य परिवारांचे कुटुंब उध्वस्त होत चालल्याचे अनेक जणांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आता याच प्रश्नी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी पुढाकार घेतला आहे.

पोपेरे यांनी महिलांबरोबर दारूच्या दुकानावर धडक मोर्चा काढत दारूबंदी विषयी आक्रमक भूमिका घेतली. बेकायदा दारू विक्रीच्या दुकानांवर गावातील महिलांसह हल्ला करत चार दुकाने बंद पाडली. शिवाय दारूच्या बाटल्या फोडत प्रशासनाचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.

यावेळी त्यांच्याबरोबर ग्रामीण भागातील महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकदा तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने राहीबाईंसह गावातील महिलांनी थेट दारूच्या दुकानांवर धाव घेतली. शासनाने दारूविषयी योग्य ती भूमिका घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पद्मश्री राहीबाई यांनी केली आहे.

Exit mobile version