Download App

‘हा’ आमदार माझ्या नजरेला उभा राहत नाही; राणेंनी संग्राम जगतापांना डिवचले

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane Vs Sangram Jagtap: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे राजकीय पडसाद आता नगरमध्ये उमटले लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्त, पोलिसांना राणे यांनी फटकारले. तर नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर राणे यांनी टीका केली आहे.

Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय ? म्हणत राणेंची जीभ घसरली !

हा तुमचा आमदार माझ्या नजरेला उभा राहत नाही. माझ्या वाटेला येऊ नको. 2024 जवळच आहे. या आमदाराचा कार्यक्रम करणार आहे. हा कसा निवडून येतो तेच बघतो. मी स्वतः प्रचाराला येईल. हिंदुत्वाची ताकद दाखविणार आहे, असा इशाराच राणे यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिला आहे.

अजित पवारांबाबत अफवा, फडणवीसांची चुप्पी अन् मीडियाची धावपळ

राणे म्हणाले, हिंदू एकत्र येत नाहीत. म्हणून हे डिवचत आहे. पाहिजे ती मस्ती करत आहे. युपीसारखे मिट्टी मे मिला देंगे. मुख्यमंत्री, पालकमंत्री भाजपचे आहे हे पोलिस प्रशासनाने लक्षात ठेवावे. या सगळ्यांना कसे सरळ करायचे आहे. हे मला चांगले माहीत आहे. आमदारांनी हे लक्षात ठेवावे, असे म्हणत राणे यांनी संग्राम जगताप यांना डिवचले आहे.

त्याचबरोबर राणे यांनी नगरचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत. भाजपचे राधाकृष्ण विखे आहेत हे लक्षात ठेवावे, असे म्हटले आहे.

Tags

follow us