हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर नजर जाग्यावर ठेवणार नाही; नितेश राणेंचा इशारा

Solapur Hindu Janakrosh Morcha : गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा लव्ह जिहाद, भोंगे, अजान, वक्फ बोर्ड कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आताही त्यांनी भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. प्रत्येक इंच जमीन फक्त हिदूंचीच आहे, असं वक्तव्य केलं. ते आज […]

Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंच वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane

Solapur Hindu Janakrosh Morcha : गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा लव्ह जिहाद, भोंगे, अजान, वक्फ बोर्ड कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आताही त्यांनी भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. प्रत्येक इंच जमीन फक्त हिदूंचीच आहे, असं वक्तव्य केलं. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, दिवसभरात 154 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू 

आज सोलापूरात वक्फ बोर्ड कायद्याविरोधात नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मोर्चाला संबोधित करतांना राणे चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, मला पत्रकार नेहमी विचारत असतात, की भारत हा देश हिंदूराष्ट्र कधी होणार? मला सांगावसं वाटतं की, भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. इथली प्रत्येक इंच जमीन ही फक्त हिदूंचीच आहे. बाकी कोणाचीही नाही. इथल्या जमीनीवर फक्त आणि फक्त हिंदूंचाच अधिकार आहे, असं राणे म्हणाले.

Chhagan Bhujbal : ओबीसी आयोग की, मराठा आयोग माझ्या मनात शंका; भुजबळांनी केला सवाल 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, ज्या देशात नव्वद टक्के हिंदू राहतात, त्या देशाला हिंदू ऱाष्ट्रच म्हणतात. आमच्या कुठल्याही हिंदूला जर कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल तर ती आम्ही ती नजर जाग्यावर ठेवणार नाही. ठेवायची नाही, असा इशाराही राणेंनी दिला. ते म्हणाले, या मोर्चाला बहुसंख्यं हिंदू जमले आहेत. एवढे हिंदू जमले की, उभ राहायला जागाही नाही. आता विचार करा, देशभरातीतल हिंदू एकत्र आले तर या दाढी कुरवाळणारे पायाखालीच चिरडले जातील, असंही राणे म्हणाले, ..

यावेळी नितेश राणेंनी सोलापुरातील अनेक भागात भेटी दिल्या. सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन घेतलं.

दरम्यान, सोलापुरात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी यावेळी दोन दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Exit mobile version