Download App

धक्कादायक ! कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला; अत्याचार करून खून केल्याचा संशय

ही मुलगी बुधवारीपासून बेपत्ता होती. मुलीचा पालक शोध घेत होते. गुरुवारी मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

  • Written By: Last Updated:

body of a ten-year-old girl was found in Kolhapur: कोल्हापूरः बदलापूरमधील (Badalapur) चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यात संतापाचे वातावरण असताना कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूरमधील (Kolhapur)करवीर तालुक्यातील शिये गावातील रामनगर भागात ही घटना घडली आहे.

 

ही मुलगी काल बुधवारीपासून बेपत्ता होती. मुलीचा पालक शोध घेत होते. गुरुवारी मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लाडकी बहिण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरमध्ये होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

काकाने मारले…
बिहारमधील एक कुटुंब हे रोजदारांसाठी येथे आलेले आहे. बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलगी व तिचा काका यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यातून काकाने मुलीला मारहाण केली. ती मुलगी घरातून निघून गेले. पालकांनी मुलाचा शोध घेतला. परंतु ती आढळून आले नाही. त्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याचे तक्रारही दिली होती. परंतु गुरुवारी दुपारी मुलीचा मृतदेह घराजवळच असलेल्या उसाच्या शेतात आढळून आला आहे. त्यामुळे मोठे खळबळ उडाली आहे.

follow us