Breaking! केडगाव एमआयडीसीमधील तेल कंपनीला भीषण आग

अहमदनगरमधील केडगाव इथल्या औद्यागिक वसाहतीतील एका नामंकित कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने भयानक पेट घेतला असून इतर कंपन्यांनाही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल […]

Iraq Fire Break out

Iraq Fire Break out

अहमदनगरमधील केडगाव इथल्या औद्यागिक वसाहतीतील एका नामंकित कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने भयानक पेट घेतला असून इतर कंपन्यांनाही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल

आगीची माहिती मिळताच नगरसेवक मनोज कोतकर, अनिल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असून अद्याप ही आग विझवण्यात यश आलेलं नाही.

Chhota Pudhari; पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना दोन हजाराच्या नोटेचा झटका

या कंपनीमध्ये कच्च्या तेलाची निर्मिती होत असल्याने कंपनीत मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा आहे. तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने या आगीने रुद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. या आगीची तीव्रता पाहुन स्थानिकांसह पोलिस प्रशासनाने अग्निशमन दलाच्या आणखी गाड्यांसाठी संपर्क केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, रुद्र रुप धारण केलेली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांकडून अथक परिश्रम घेण्यात येत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागलीय? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Exit mobile version